अर्थसंकल्प : मराठवाड्याचे भाग्य उजळणार, वॉटर ग्रीडसाठी २०० कोटी, आमदार निधीही वाढला


वेब टीम : मुंबई
मराठवाड्यात पाणी पुरवठा योजना प्रभावीपणे लागू करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे.

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी 200 कोटी रुपये, पाणी पुरवठा विभागासाठी एकूण 2042 कोटी रुपये आणि पाणी पुरवठा योजनेसाठी 1200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

राज्य सरकारने आमदार विकास निधीसाठी दिल्या जाणार्‍या रकमेत 1 कोटी रुपयांची वाढ केली आहे.

यापूर्वी आमदारांना आपल्या भागांचा विकास करण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी दिला जात होता.

आता हा निधी वाढवून 3 कोटी रुपये केला जात आहे अशी घोषणा अर्थमंत्री पवार यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post