भाजपच्या नेत्या, माजी मंत्री म्हणतात, मी गुढी उभारणार नाही... कारण...


वेब टीम : मुंबई
करोनानं थैमान घातल्यामुळे कितीतरी जीव गमावले.

इटलीसारखा सुंदर देश, अमेरिका एक बलाढ्य राष्ट्र ही करोनासमोर अस्वस्थ लढत आहे.

आणि आज गुढी पाडवा, पण मी आणि माझ्या परिवाराने ठरवलं आहे की आज गुढी चढवायची नाही.

जेव्हा करोना हरेल आणि भारत जिंकेल, तेव्हा गुढी उभारायची नव्या पहाटेची!,’ असा निर्णय पंकजा मुंडे यांनी जाहीर केला आहे.

करोनाच्या संकटाने संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये गेला आहे.

वेगान होत असलेला संसर्ग आणि करोनाग्रस्तांची वाढत असलेली संख्या देशाच्या चिंतेत भर घालत आहे.

महाराष्ट्रातही चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याआधीच संचारबंदी करण्यात आली.

त्यामुळे मराठी नव वर्षांचा उत्साह कमी दिसून येत आहे.

अनेक नेत्यांनी, सेलिब्रिटींनी गुढी उभारतानाचे फोटो शेअर केले.

पण, भाजपाच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुढी न चढवण्याचा निर्णय घेतला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post