कोरोनामुळे रेल्वे झाली ठप्प; होणार कोट्यवधींचा तोटा


वेब टीम : मुंबई
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बंद केलेल्या लोकल सेवेमुळे रेल्वेला मुंबईतून मिळणाऱ्या तब्बल २२० कोटींच्या महसुलाचा तोटा सहन करावा लागणार आहे.

रेल्वेतील गर्दीतून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

यामुळे २३ ते ३१ मार्च या कालावधीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्या बंद केल्या आहेत.

मध्य रेल्वेवर दिवसाला सरासरी १४ कोटींचे उत्पन्न मिळते.

यात लोकलमधून सुमारे २.४५ कोटी,माल गाड्यामधून मिळणाऱ्या ५.११ कोटी रुपयांचा समावेश आहे.

पश्चिम रेल्वेवर दररोज साधारणपणे ८ कोटींची कमाई होते. यात लोकलसेवेतून मिळणाऱ्या सरासरी २ ते २.१५ कोटी रुपयांचा समावेश आहे.

मालगाड्या रिकाम्या करण्यासाठी काही प्रमाणात मजुरांची कमतरता जाणवत आहे.

यामुळे मालगाड्या रिकाम्या करण्याची प्रक्रिया मंदगतीने सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी खासगी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

लोकल बंद झाल्यामुळे पोलिस, आरोग्य, सफाई कर्मचारी आणि बँकिंग क्षेत्र यांसारख्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचा प्रवास त्रासदायक झाला आहे.

बेस्ट आणि एसटीच्या बसमधून टप्प्याटप्याने कार्यालय गाठावे लागते.

बेस्ट, एसटी बसमधील खडतर प्रवास आणि त्यांचे रेल्वेपेक्षा चौपट दर यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे महिन्याचे बजेट कोलमडल्याचे दिसते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post