कोरोना संशोधनात भारतही पुढे; चौदा प्रकारच्या लस तयार, चाचण्या सुरु


वेब टीम : दिल्ली
जगभरात कोरोना विषाणूवर लस शोधण्याचे काम सुरू असताना भारतातही यासाठी तब्बल चौदा लस तयार केल्या जात आहेत.

त्यापैकी चार प्रकारच्या लस चाचणीच्या जवळ पोहोचल्या असून,

येत्या तीन ते पाच महिन्यांत त्यांच्यावर क्लिनिकमध्ये चाचणी घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली.

भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांच्याशी ऑनलाइन संभाषणात हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, कोरोना विषाणूचा धोका रोखण्यासाठी संपूर्ण जग लस विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे.

१०० हून अधिक वैद्यकीय संशोधक जगभरात लसींवर संशोधन करीत आहेत.

जागतिक आरोग्य संघटना या प्रयत्नांना पाठबळ देत आहे.

या संशोधनात भारतही सक्रिय योगदान देत असून, सुमारे १४ लसींवर भारतात संशोधन सुरू आहे.

या सर्व लसींचे संशोधन वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरू असून उद्योग आणि शिक्षणतज्ज्ञही यात सहकार्य करीत असल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

विज्ञान मंत्रालय बायोटेक्नॉलॉजी विभागाला या सर्व प्रयत्नांमध्ये मदत करीत आहे.

या संशोधनावर कार्य करणाऱ्या व्यक्तीस आर्थिक मदतीसह नियामक परवानगी दिली जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

तसेच संभाव्य १४ लसींपैकी चार प्रकारच्या लस पुढील तीन ते पाच महिन्यांत क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात पोहोचतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post