चंद्रकांत पाटलांनी सांगितलं, का दिलं गोपीचंद पडळकरांना विधानपरिषदेचं तिकीट?


वेब टीम : मुंबई
भाजपने विधानपरिषदेसाठी वरिष्ठ नेत्यांना बाजूला सारून नवीनचेहऱ्यांना संधी दिली आहे.

त्यात प्रामुख्याने धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचाही समावेश आहे.

मात्र पक्षातील जेष्ठांना डावलत नवीन लोकांना संधी कशी कायमिळाली याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पडळकरांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरुद्ध लढण्यासाठी तिकिट माघितली नव्हती.

गोपीनाथ पडळकर यांना विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या विरुद्ध लढण्यासाठी भाजपाने घोड्यावर बसवलं, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची तिकिट दिलं असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विधानसभेच्या निवडणुकीत पडळकर यांचा अजित पवारांनी दारुण पराभव केला होता.

त्यानंतर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकून ‘गो बॅक मोदी’ असा नारा लगावला होता.

नरेंद्र मोदी यांच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्या नेत्याला विधानपरिषदेची उमेदवारी दिली जाते.

मात्र अनेक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्यांना डावललं जाते.

त्यामुळे भाजपा कोणत्या दिशेने चालली, यावर चिंतन करण्याची गरज असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post