मोदींचे गुजरात मॉडेल 'फेल'; उच्च न्यायालयाने काढले सरकारी रुग्णालयाचे वाभाडे


वेब टीम : अहमदाबाद
कोरोनामुळे गुजरातमधील परिस्थितीही चिंताजनक आहे.

गुजरातमध्ये कोरोनाचा मृत्यूदर काळजी वाढवणारा असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे.

कृत्रिम नियंत्रणाच्या प्रयत्नावरून गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फैलावर घेतले.

अहमदाबादमधील शासकीय रुग्णालयातील परिस्थितीवरून न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले.

सरकारी रुग्णालय एखाद्या अंधार कोठडीसारखे आहे. त्यापेक्षाही भयानक स्थिती आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

अहमदाबादमध्ये कोरोनावर उपचार करणारे मुख्य शासकीय रुग्णालय आहे.

या रुग्णालयात आतापर्यंत ३७७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील एकूण मृत रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयातील मृतांचे प्रमाण ४५ टक्के इतके आहे.

राज्यातील करोना नियंत्रणाबरोबर रुग्णांना उपचार मिळण्याविषयी गुजरात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

या याचिकावर न्यायमूर्ती जे. बी. परदीवाला आणि इलेश व्होरा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post