विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : जेईईच्या परीक्षेची तारीख जाहीर; या तारखेला परीक्षा...


वेब टीम : दिल्ली
आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जेईई परीक्षेची तारिख जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती.आता १८ ते २३ जुलै दरम्यान ‘जेईई’ मेन्स ची परीक्षा घेण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी नीट परीक्षा २६जुलै रोजी घेण्यात येणार आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई आणि नीट परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

IIT-JEE (MAIN) परीक्षा १८, २०, २१, २२ आणि २३ जुलै रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ऑगस्टमध्ये आयोजित होणाऱ्या IIT-JEE अॅडव्हान्स परीक्षांचे वेळापत्र काही दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. NEET परीक्षा २६ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

जेईई परीक्षांमार्फत देशभरातील इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. तर राष्ट्रीय पात्रतेसह घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेमार्फत देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो.

देशभरातील १५लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी अर्ज केला आहे.यामार्फत देशभरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. तर ९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई-मेन्स परीक्षेसाठी अर्ज केला आहे.

जेईई मेन्स परीक्षेमार्फत आयआयटी वगळता इतर इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. जेईई मेन्स परीक्षा जेईई अॅडवान्स परीक्षेसाठी महत्त्वाची मानली जाते. जेईई अॅडवान्स परीक्षेमार्फत आयआयटीमध्ये प्रेवश देण्यात येतो.

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) च्या १०वी आणि १२ वीच्या परीक्षांच्या तारखाही लवकरच जाहीर केल्या जातील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post