राज्यभरात ५७ हजार उद्योगांना दिली परवानगी; २५ हजार कंपन्या सुरु


वेब टीम : मुंबई
कोरोना संकटामुळे जगभरातील उद्योग, व्यापार ठप्प आहेत. राज्यावरदेखील याचा विपरित परिणाम झाला आहे.

असे असले तरी उद्योग विभागाने ठोस पावलं उचलल्याने उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येत आहे.

रेड झोन वगळता सध्या राज्यात ५७ हजार ७४५ उद्योगांना परवाने दिले असून २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे.

त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात ९ हजार १४७ कारखान्यांना परवाने दिले आहेत.

त्यापैकी ५७७४ कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे.

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर, पुणेच्यावतीने आयोजित वेबीनारमध्ये आज उद्योगमंत्री सुभाष देसाई ही माहिती दिली.

ना. देसाई म्हणाले की, मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड हा भाग रेड झोनमध्ये आहे.

येथील उद्योग सुरू करण्याची मागणी होत आहे.

परंतु मुख्यमंत्र्यांनी मे अखेर महाराष्ट्र ग्रीन झोन करायचा संकल्प केला आहे.

त्यामुळे तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे. आपली पहिली लढाई कोरोनासोबत आहेत. त्यामुळे थोडी घाई करू नये.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post