अनिल परब म्हणजे निष्क्रिय मंत्री : निलेश राणे


वेब टीम : मुंबई
५० दिवस झाले असतानाही अडकलेल्या लोकांना स्वगृही परत कसं पाठवायचे हे अजून सरकारला उमगलेलं नाही.

कलानगरची सीट घालवणारे परिवहन मंत्री अनिल परब हे निष्क्रिय आहेत,” अशी बोचरी टीका भाजपा नेते निलेश राणे यांनी केली आहे.

“परराज्यातील मजुरांना जसं त्यांच्या गावी पाठवण्यात येत आहे, तसंच राज्यात अडकलेल्या लोकांनाही घरी जाण्यासाठी एसटीच्या माध्यमातून विचार सुरू आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीनंतरच याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल,” असं परब म्हणाले होते.

यावरून राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

“जवळपास ५० दिवस झाले असले तरी अडकलेल्या लोकांना परत कसं पाठवायचे हे अजून सरकारला कळलेलं नाही.

कलानगरची सीट घालवणारे परिवहन मंत्री अनिल परब हे निष्क्रिय आहेत.

आपली लोकं गेली ५० दिवस तडफडत आहेत.

पण राज्य सरकारला परराज्यातील लोकांसाठी वेळ आहे, महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या लोकंसाठी नाही,” असं राणे म्हणाले.

त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post