महाराष्ट्रात कणा नसलेले मुख्यमंत्री आणि कोरोनाची वाढती संख्या हे वास्तव : नितेश राणे


वेब टीम : मुंबई
“शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी जगातल्या करोनाची उदाहरणं देऊ नयेत.


आधी महाराष्ट्रात काय सुरु आहे ते बघावं.


कणा नसलेले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रात करोना रुग्णांची वाढलेली संख्या हे वास्तव आहे.


करोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.


अशावेळी न्यूयॉर्कशी आपली तुलना करण्यापेक्षा इथली परिस्थिती सुधारण्यासाठी काही तरी करावं.


इथल्या परिस्थितीबाबत थोडी तरी लाज बाळगावी” या आशयाचं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.


तसेच, आदित्य ठाकरेंनी ट्विट केलेल्या दुसऱ्या फोटोवरुनही नितेश राणेंनी आदित्य यांनाच लक्ष्य केलंय.


जर, सत्तेची लालसा मुलाला पर्यावरणमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न कुठलेही कष्ट न घेता पूर्ण करु शकते.


तर, सर्वकाही शक्य आहे मित्रा.. असे नितेश राणेंनी म्हटलं आहे.


कोरोना विषाणू प्रादुर्भावाला नियंत्रणात ठेवण्यात राज्यकर्ते सपशेल अपयशी ठरल्याचे म्हणत आज भाजपने राज्यभर महाराष्ट्र बचाओ आंदोलन केले.


या आंदोलनावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जगातल्या करोनाग्रस्तांच्या संख्येबाबत बोलू नये.


कारण त्यांचे वडील म्हणजेच उद्धव ठाकरे ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्या महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे.


इथल्या परिस्थितीची तुलना न्यूयॉर्कशी करण्यापेक्षा इथली परिस्थिती नियंत्रणात कशी आणता येईल ते बघा अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.


एक ट्विट करत त्यांनी आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post