कर्जाच्या ईएमआयबाबत होणार मोठी घोषणा... आरबीआय घेणार 'हा' निर्णय


वेब टीम : दिल्ली
लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यामध्येच आरबीआयने सर्व टर्म लोनवर 3 महिन्यांचा मोरटोरियम लागू केला आहे.

यामुळे बँकांना आरबीआयने वाहन, गृह किंवा इतर मुदत कर्जांचा ईएमआय 3 महिन्यांसाठी स्थगित करण्याची परवानगी दिली होती आणि यामुळे ग्राहकांचा क्रेडिट स्कोअरदेखील खराब होणार नाही.

आरबीआयच्या सूचनेचे पालन करत अनेक महत्त्वाच्या बँकांनी ग्राहकांना तीन महिन्याच्या ईएमआयसाठी सूट दिली होती.

आरबीआयकडून देण्यात आलेली ही स्थगितीची परवानगी आणखी तीन महिन्यासाठी वाढवली जाण्याची शक्यता आहे.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आरबीआयकडून याबाबत निर्णय येऊ शकतो.

सामान्यांना दिलासा देण्यासाठी आरबीआय हा निर्णय घेऊ शकते.

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना सर्व बँकांच्या प्रमुखांनी हा सल्ला दिल्याची माहिती मिळत आहे.

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यामध्ये जो मोरटोरियम घोषित करण्यात आला होता त्यानुसार तीन महिन्यासाठी कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्यात आले होते.

सर्व वाणिज्य बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँक आणि स्थानिक क्षेत्रातील बँकांसह सहकारी बँका, अखिल भारतीय वित्तीय संस्था आणि एनबीएफसी, गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि मायक्रो-फायनान्स संस्थांना ईएमआय स्थगिती देण्यास परवानगी देण्यात आली होती.

ग्राहकांना याकरता अर्ज करण्याची गरज नव्हती, असे स्पष्टीकरण एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिले होते.

आरबीआयच्या पॉलिसीमध्ये मुदत कर्जांचा स्पष्ट उल्लेख आहे. ज्यात गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्जे, वाहन आणि ज्यामध्ये मुदतीचा कालावधी आहे

अशा कोणत्याही कर्जांचा समावेश आहे. यात मोबाईल, फ्रीज, टीव्ही इ. वरील ईएमआयचाही समावेश आहे.

आता हा निर्णय झाल्यास आणखी तीन महिन्यासाठी ईएमआय पुढे ढकलला जाऊ शकतो. परिणामी सामान्यांना या कठीण प्रसंगात मोठा दिलासा मिळेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post