वेब टीम : मुंबई विधानसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या विरोधात जोरदार भाषण करणाऱ...
वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या विरोधात जोरदार भाषण करणाऱ्या अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे.
मिटकरी यांना तिकीट देत पक्षाने एकप्रकारे निवडणुकीची बक्षिसीच दिल्याचे दिसते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी दोन उमेदवार जाहीर केले आहे.
त्यात शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना विधान परिषदेचं तिकीट जाहीर करण्यात आले आहे.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
विधानपरिषदेसाठी शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांचे नावं जवळपास निश्चित झाले होते.
मात्र यावर अंतिम निर्णय शरद पवारच घेतील अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली होती.
शशिकांत शिंदे यांना माथाडी कामगार नेते म्हणून ओळखले जाते.
तर अमोल मिटकरी यांनी विधानसभेच्या निवडणुकीवेळी जोरदार प्रचार केला होता.
प्रचारादरम्यान त्यांची भाषणं प्रचंड गाजली होती. पक्षात त्यांचा एक चाहता वर्ग निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकरी यांचं अनेकदा जाहीरपणे कौतुकही केलं आहे.
अखेर त्यांना पक्षाकडून विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळाली आहे.
COMMENTS