वेब टीम : मुंबई ‘छोटे मियाँ’ या कॉमेडी रिअॅलिटी शोमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता मोहित बघेल (वय २७) याचे शनिवारी निधन झाले आहे. मोहित ल...
वेब टीम : मुंबई
‘छोटे मियाँ’ या कॉमेडी रिअॅलिटी शोमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता मोहित बघेल (वय २७) याचे शनिवारी निधन झाले आहे.
मोहित लहानपणापासून कर्करोगग्रस्त होता. अखेरच्या काही दिवसांमध्ये तो नोएडा येथील रुग्णालयात उपचार घेत होता.
परंतु कर्करोगाचा प्रभाव वाढल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले.
‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोचे दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी ट्विट करुन मोहितच्या निधनाची बातमी दिली.
परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत जबरिया जोडी या चित्रपटात मोहितने काम केले होते.
मोहितचा जन्म उत्तर प्रदेशमधील एका गरीब कुटुंबात झाला होता.
अभिनेता होण्यासाठी तो मुंबईत आला.
त्याने ‘छोटे मिया’ या कॉमेडी शोमधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते.
त्यानंतर त्याला सलमान खानच्या ‘रेडी’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
या चित्रपटात त्याने ‘छोटे अमर चौधरी’ ही भूमिका साकारली होती.