वेब टीम : अहमदनगर संगमनेर तालुक्यातील ०४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून यातील एक जण काल नाशिक येथे बाधीत आढळून आलेल्या ...
वेब टीम : अहमदनगर
संगमनेर तालुक्यातील ०४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून यातील एक जण काल नाशिक येथे बाधीत आढळून आलेल्या रुग्णाची नातेवाईक आहे
तर दुसऱ्या व्यक्तीला न्युमोनियाचा त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हे दोघे संगमनेर शहरातील आहेत. आणखी एक जण निमोण येथील आहे.
निमोण येथील त्या व्यक्तीचा आज सकाळी येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता.
त्याचा अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला त्यात तो बाधीत असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, निमोण येथीलच एक व्यक्ती नाशिक येथे बाधीत आढळून आली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ६६ झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. इतर २३ अहवालही प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत,
COMMENTS