अहमदनगर : कोरोना शंभरीजवळ, मुंबईहून तिघांनी आणला कोरोना


वेब टीम : अहमदनगर
जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, उर्वरित १६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले.

त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत.

यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात बाहेरील जिल्हयातून आलेल्या १९ व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत

तर जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ७५ इतकी असल्याचे  जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.

बाधीत आढळून आलेल्या व्यक्तींमध्ये मुंबईतील भोईवाडा, परळ येथून नगर तालुक्यातील पिंपळगाव रोड, चास येथे आलेली २४ वर्षीय व्यक्ती,

घाटकोपर येथून संगमनेर तालुक्यातील केळेवाडी येथे आलेली ३२ वर्षीय व्यक्ती आणि भाईंदर येथून श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे आलेल्या तीस वर्षीय महिलेचा समावेश आहे.

सदर महिला काल बाधित आढळून आलेल्या रुग्णाची पत्नी आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post