अमित शाह म्हणतात... मी एकदम ठणठणीत; कुठलाही आजार नाही...


वेब टीम : दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आरोग्यावरून सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा उठल्या आहेत.

त्यांना काही आजार झाला असावा अशीही चर्चा सुरू होती.

परंतु, स्वतः शहांनी आपल्या ट्विटर हँडलवर याचे स्पष्टीकरण जारी करताना या सर्व केवळ अफवा असल्याचे सांगितले.

सोबतच, आपण सुखरूप असून आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार झालेला नाही असेही अमित शहा यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी ट्विटवरुन आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे  आवाहन केले आहे.

मला कुठलाही आजार झालेला नाही. मी पूर्णपणे सुखरूप आहे.


गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझ्या आरोग्याबद्दल विविध प्रकारच्या अफवा उठल्या आहेत.

काहींनी तर माझ्या मृत्यूवर प्रार्थना करण्याचे आवाहन सुद्धा केले.

देश सध्या कोरोनासारख्या गंभीर आजाराशी लढत आहे आणि देशाचे गृहमंत्री या नात्याने कामात व्यस्त असल्याने मी याकडे लक्ष देत नाही.

सगळेच आपल्या काल्पनिक विचारांतून आनंद लुटत असल्याचे पाहून मी काहीच स्पष्टीकरण दिले नव्हते.

परंतु, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि मित्रांनी गेल्या दोन दिवसांपासून खूप चिंतीत असल्याचे व्यक्त केल.

त्यांच्या चिंतेवर मी दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळेच, मी स्पष्ट करू इच्छितो की मला काहीच झालेले नाही.

मला कुठलाही आजार नाही, असे अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.


अमित शाह यांची पोस्ट —
“मागील काही दिवसांपासून काही मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या आरोग्यासंदर्भात वाटेल त्या अफवा पसरवल्या. काही लोकांनी तर माझा मृत्यू व्हावा म्हणून ट्विट करुन प्रार्थनाही केली.

देश सध्या करोनासारख्या जागतिक महारोगाशी लढा देत आहे. देशाचा गृहमंत्री म्हणून मी रात्रंदिवस माझ्या कामात व्यस्त असल्याने मी या गोष्टींकडे फारसे लक्ष दिलं नाही. जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली तेव्हा मी विचार केला की हे सर्व लोक त्यांच्या काल्पनिक आनंदामध्ये जगत आहेत. त्यामुळेच मी कोणतेही स्पष्टीकरण दिले आहे.

मात्र माझ्या पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांमुळे आणि माझ्या शुभचिंतकांमध्ये मागील दोन दिवसापासून यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात होती. त्यांच्या चिंतेकडे मी कानाडोळा करु शकत नाही. त्यामुळेच मी आज हे स्पष्ट करु इच्छितो की मी पूर्णपणे बरा आहे मला कोणताही आजार झालेला नाही.

हिंदू धर्मातील मान्यतेनुसार असं मानलं जातं की अशाप्रकारची अफवा पसरवल्यास व्यक्ती अधिक मजबूत होते. त्यामुळे मी अशा सर्व लोकांकडून अपेक्षा करतो की त्यांनी या व्यर्थ गोष्टी करु नयेत आणि मला माझे काम करु द्यावे तसेच त्यांनी स्वत:चे काम करावे.

माझ्या तब्बेतीबद्दल चिंता करणाऱ्या आणि विचारपूस करणाऱ्या माझ्या सर्व शुभचिंतकांचे आणि कार्यकर्त्याचे आभार मानतो.

ज्या लोकांनी ही अफवा पसरवली आहे त्या लोकांविरोधात माझ्या मनात कोणताही राग नाही
– अमित शाह

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post