... ते लोकं आज महाराष्ट्र वाचवायला निघालेत : अमोल मिटकरी


वेब टीम : मुंबई
भाजपच्या आंदोलनावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सडकून टीका केली आहे.

‘महाराष्ट्र पाण्यात बुडत असतांना ज्यांनी शांतपणे पहिला,

संकटकाळातील निधी ज्यांनी दिल्लीला पाठवला,

शेतकरी आत्महत्येचा आलेख ज्यांनी चढता ठेवला ते आज महाराष्ट्र वाचवायला निघालेत व्वा !

राजकुमार यांचा एक गाजलेला डायलॉग… ‘कव्वे की चोंच मारने से पहाड नहीं तुटते’.

अस म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर शरसंधान साधलं आहे.

कोरोनाचे देशात सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू, आरोग्य व्यवस्था पूर्ण कोलमडलेली आणि सामान्य माणूस हतबल.

अशा स्थितीतही निष्क्रीय असलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या अडीच लाख कार्यकर्त्यांनी शुक्रवारी राज्यभर ठिकठिकाणी ‘माझे अंगण, रणांगण’, अशी घोषणा देत ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन केले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे हे अभिनव आंदोलन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post