आशिष शेलार म्हणाले; 'आपण हसायचं दुसऱ्याला आणि शेंबूड आपल्या नाकाला...'


वेब टीम : मुंबई
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचे  (आयएफएससी)  मुख्यालय गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये होणार असल्याची अधिसूचना काढण्यात आली आहे.

गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट गिफ्ट सिटी’ निर्माण होतो आहे. 

आयएफएससीचे मुख्यालय गांधीनगरला हलवल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होतो आहे.

याबाबत आशिष शेलार यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर टीका करताना ट्विट्स केले आहेत. 

त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “आज गळे काढणार्‍यांनी २००७ ते २०१४ दरम्यान काय केले? आयएफएससी आजही मुंबईत शक्य आहे.

तसा प्रस्ताव आम्हीच दिला होता.

आता तुम्ही महाराष्ट्राचे सत्ताधारी आहात नुसता शिमगा करू नका, केंद्राला सांगा.

केंद्राकडे मागा, त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करा. आम्ही सोबत आहोत.”

शिवसेनेवर टीका करताना शेलार म्हणाले, “काही जण काँग्रेसच्या तालावर आज टिपऱ्या खेळत आहेत.

आता आयएफएससीवरून बेंबीच्या देठापासून जे ओरडत आहेत, शंख करीत आहेत, कोल्हेकुई करीत आहेत.

त्यांची अवस्था तर ‘आपण हसायचं दुसऱ्याला आणि शेंबूड आपल्या नाकाला’ अशी झाली आहे.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post