संजय राऊत म्हणाले, 'बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाणांचा मी आभारी...'


वेब टीम : मुंबई
महाराष्ट्र विधान परिषदेचया नऊ जागांसाठी निवडणूक बिनविरोध होईल.

राज्यातील करोना संकट आणि मुख्यमंत्री ऊधदव ठाकरे यांची उमेदवारी याचा विचार करून कॉंग्रेस पक्षाने एक ऊमेदवार मागे घेण्याची भुमिका घेतली.

मी प्रदेश अध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात व ना.अशोक चव्हाण यांचा आभारी आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी आभार मानले आहे.

२१ मे रोजी होणाऱ्या विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार की नाही यावर आता पडदा पडला आहे.

महाविकासआघाडी विधान परिषदेच्या पाच जागा लढणार असल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

कोरोनाचे संकट बघता काँग्रेसने एक पाऊल मागे घेतले आहे. आपला एक उमेदवार मागे घेतला जाणार आहे.

मुख्यमंत्री आमच्याच आघाडीचे असल्याने ही निवडणूक बिनविरोध करणे ही आमची भूमिका आहे.

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिनविरोध निवडले जातील यात काहीही शंका नसल्याचे थोरात म्हणाले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबद्दल आभार मानले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post