भाजपाकडून फोडाफोडीचे राजकारण; 'या' मोठ्या नेत्याने केला भाजपात प्रवेश


वेब टीम : चेन्नई
एकीकडे संपूर्ण देश कोरोनाच्या विरोधात लढा देत असताना भाजपकडून मात्र फोडाफोडीचे राजकारण सुरु केले आहे.

तमिळनाडूनत द्रमुकच्या सरचिटणीसपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी व्ही.पी.दुराईसामी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

त्यांच्या या प्रवेशामुळे तामिळनाडूत भाजपची ताकद नक्कीच वाढणार आहे.

द्रमुक पक्ष स्थापना करण्यावेळी असलेल्या मूळ विचारधारेपासून दूर गेला आहे.

यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

भाजप हा चांगला हेतू असलेला पक्ष असून, या पक्षात मी प्रवेश करीत आहे, असे दुराईसामी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांची काही दिवसांपूर्वी दुराईसामी यांनी भेट घेतली होती.

दुराईसामी यांची काल (ता.21) पक्षाच्या उपसरचिटणीस पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.
यावर बोलताना दुराईसामी काल म्हणाले होते की, ही बातमी माझ्यासाठी अतिशय धक्कादायक आहे.

माझ्या जागी राज्यसभा खासदार अंधियूर सेल्वराज यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना मी शुभेच्छा देतो. ते काही माझे शत्रू नाहीत. 

दुराईसामी हे तमिळनाडू विधानसभेचे दोन वेळा उपासभापती होते.

ते 1989 ते 1991 आणि 2006 ते 2011 या काळात उपसभापती होते.

भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्याने राज्यातील राजकीय वतुर्ळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती.

द्रमुक आणि भाजपमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद असल्याने या घडामोडीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post