मुख्यमंत्री ठाकरेंचा मार्ग मोकळा; विधानपरिषद निवडणूक होणार बिनविरोध...


वेब टीम : मुंबई
विधानसभेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसने २ उमेदवार दिल्याने विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार की नाही असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

मात्र काँग्रेसने एकच जागा लढवण्यास तयारी दाखवल्याने आता महाविकास आघाडी पाच जागांवर निवडणूक लढवणार आहे.

यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे.

महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाविकास आघाडीने सहा जागा लढवाव्या ही काँग्रेसची अपेक्षा होती.

मात्र निवडणूक घेणे सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या परिस्थितीत अवघड आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनंती केली की निवडणूक बिनविरोध करु.

या सगळ्या गोष्टींचा विचार करुन महाविकास आघाडी पाच जागा लढणार आहे.

त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

कोरोनाचे संकट पाहून आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मार्ग मोकळा झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post