वेब टीम : दिल्ली कोविड रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड रूग्णास...
वेब टीम : दिल्ली
कोविड रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड रूग्णासाठी सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशीही ताप नसल्यास त्याला दहाव्या दिवशी डिस्चार्ज देण्यात यावा,
असे यात सांगितले आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार आता राज्यातही कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड रूग्णासाठी सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशीही ताप नसल्यास त्याला दहाव्या दिवशी डिस्चार्ज देण्यात यावा.
यासाठी कोवीड चाचणी करण्याची गरज नाही
डिस्चार्जनंतर या संबंधित रूग्णास सात दिवस होम क्वॉरंटाईन गरजेचे राहिल.
डिस्चार्ज देण्यापूर्वी ऑक्सीजनचे प्रमाण ९५ टक्के पेक्षा कमी आढळल्यास तर त्या डेडिकेटेड कोविड सेंटर मध्ये दाखल करावे.
मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णाला तीन दिवसांत रुग्णांमधील ताप कमी झाला असेल तर आणि पुढील चार दिवस ऑक्सिजनचे प्रमाण ९५ टक्के पेक्षा जास्त असेल अशांना लक्षणे सुरु झाल्यापासून दहा दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात यावा.
या रुग्णांना डिस्चार्ज करतांना पुन्हा कोविड चाचणीची गरज नाही. तसेच डिस्चार्जनंतर सात दिवस होम क्वॉरंटाईन करावे.
गंभीर रुग्णांसाठी रुग्णांमध्ये लक्षणे आढळून न येता त्यांच्या कोविड चाचणीचा रिपोर्टही निगेटिव्ह येणे आवश्यक आहे.
या रुग्णांचा एक नमुना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.
ही चाचणी कोविड लक्षणे नाहिशी झाल्यानंतरच करण्यात येईल.
या रुग्णांना लक्षणे आढळल्यापासून डिस्चार्ज करेपर्यंतचा कालावधी किमान दहा दिवस असावा.
COMMENTS