गाजलेल्या 'दृश्यम' चित्रपटाच्या पुढच्या भागाची घोषणा; टीझर प्रदर्शित


वेब टीम : मुंबई
दाक्षिणात्य कलाविश्वाचे सुपरस्टार मोहनलाल यांनी आपल्या ‘दृश्यम २’ चित्रपटाच्या टीझर प्रदर्शित केला आहे.

या चित्रपटाचा टीझर २० सेकेंदांचा आहे.

एंटनी पेरुमबवूर हे चित्रपटाची निर्मिती करणार आहेत

तर दिग्दर्शक जेथु जोसफ यांच्या खांद्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी असणार आहे.

दाक्षिणात्य कलाविश्वाचे सुपरस्टार मोहनलाल ६० वा वाढदिवस केरळमध्ये आपल्या कुटुंबासोबत साजरा केला.

जन्म दिवसाचे औचित्य साधत त्यांनी चाहत्यांना हे मोठं गिफ्ट दिलं आहे.

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा केली आहे.

सोशल मीडियावर हा टीझर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

‘दृश्यम २’ चित्रपटामध्ये मोहनलाल जोर्गेकुटी ही व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत.

याचप्रमाणे २०१३ साली मल्याळी भाषेत प्रदर्शित झालेल्या मोहनलाल यांचा ‘दृश्यम’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post