आरारारारारा.... खतरनाक...! आता गांजामध्येही सापडलेत औषधी गुणधर्म


वेब टीम : दिल्ली
गांजा म्हटले आपल्याला आठवतात ते चिलीम फुकत बसलेले तरुण किंवा काही साधू महाराज.

तल्लीन होऊन आपल्याच धुंदीत जगाचा वेध घेणाऱ्या या मंडळींवर अनेक सिनेमे आणि आता वेब सिरीजमध्ये प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे.

एकूणच पांढरपेशा समाजात गांजा या मुद्यावर असाच संभ्रम आहे.

मात्र, हेच गवतवजा पिक आणि त्याचे उत्पादनात औषधी घटक असल्याचे संशोधकांनी शोधले आहे.

निसर्गाच्या या किमयेवर आता पुढे अभ्यास सुरू आहेत.

याबाबत अमेरिका केमिकल सोसायटी यांच्या इंफेक्षस डिसीज या जर्नलमध्ये याबाबतीत संशोधन प्रसिद्ध झालेले आहे.

तसेच डाऊन टू अर्थ या अभ्यासू प्रकाशनाने याबाबतीत लेख प्रसिद्ध केला आहे.

त्यात म्हटले आहे की, नशा येणाऱ्या या पदार्थाला औषधी घटक म्हणून अगोदरच मान्यता आहे.

जगभरातील १८ देशात यावरून भूल देण्याचे औषध तयार केले जाते.

मात्र, आता नव्याने केलेल्या संशोधनात असे स्पष्ट की, गांजामध्ये एंटीबायोटिक गुण आहेत.

त्यामुळे मानवी शरीराची जीवाणू या घटकाशी लढण्याची ताकद वाढते.

‘कैनाबिनॉइड’ अर्थात कैनबाइगरोल (सीबीजी) हा घटक गांजामध्ये संशोधकांना सापडला आहे.

त्यावरून याच्या ट्रायल आता उंदरांवर घेतल्या जात आहेत.

त्याचे सकारात्मक रिझल्ट आलेले आहेत.

मेथिसिलिन प्रतिरोधी बैक्टीरिया ‘स्टैफिलोकोकस ऑरियस (एमआरएसए) यावरही गांजा उपयोगी ठरेल असा दावा या संशोधकांचा आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post