भाजपला बाजारात किंमत राहिली नसल्याने आंदोलनाची जत्रा : गुलाबराव पाटील


वेब टीम : जळगाव
भारतीय जनता पक्षाने सीएम फंडला एक पैसाही दिलेला नाही, त्यांनी सर्व पैसा पीएम फंडला दिला आहे.

त्यामुळे महाराष्ट्र सरकारवर बोलण्याचा या पक्षाला कोणताही अधिकार नाही.

हा पक्ष केवळ राजकारण करीत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील जनता सर्व ओळखून आहे.

त्यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या या आंदोलनाला राज्यातील जनतेने सोशल मीडियावर "ट्रोल' केले आहे.

जनतेचा हा कौल लक्षात घेऊन तरी त्यांनी हे आंदोलन बंद केले पाहिजे होते.


परंतु या पक्षाला केवळ राजकारणच करावयाचे आहे. त्यामुळे त्यांचे राजकारण त्यांनाच लखलाभ होवो.

मात्र महाराष्ट्रातील जनता या पक्षाला निश्‍चित धडा शिकवेल.

राज्यातील सरकार अत्यंत चांगले काम करीत आहे, जनतेच्या विश्‍वासालाही ते पात्र ठरले आहे.

परंतु भारतीय जनता पक्षाला आता सरकारचे चांगले काम पहावत नाही, त्यामुळे ते आंदोलन करीत आहेत.

भारतीय जनता पक्षाला आता बाजारात किंमत नसल्यामुळे चेहरे दाखविण्यासाठी त्यांनी आंदोलनाची ही जत्रा भरविली आहे.

त्यांचे हे आंदोलन म्हणजे विझणाऱ्या दिव्याची फडफड आहे, असा टोला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सरकार व प्रशासकीय यंत्रणा कोरोना विरोधातील लढाईच्या मुकाबला मोठा धैर्याने करीत आहे.

राज्यात साडेदहा हजारापेक्षाही अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेचे हे मोठे यश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post