आरोग्यवार्ता : तांब्याच्या भांड्यात पाणी पिल्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे...


वेब टीम : पुणे
तांब्याच्या भांड्यातील पाणी पचनक्रिया सुधारुन पचनशक्ती वाढवते. 

तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी ठेवून ते सकाळी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.

तांब्याच्या भांड्यातील पाणी हृदय निरोगी बनवून ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करते. 

याशिवाय वात, पित्त आणि कफच्या तक्रारी दूर करण्यातही फायदेशीर ठरते.

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारची समस्या होत नाही. 

या पाण्यामुळे फोड, तारुण्यापीटिका तसेच त्वचेसंदर्भातील रोग होत नाहीत. तसेच त्वचा साफ आणि चमकदार होते.

अॅनिमिया अर्थात अशक्तपणा असल्यास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने फायदा होतो. 

हे पाणी लोह सहजरीत्या शोषून घेते. त्यामुळे अॅनिमिया असणाऱ्यांसाठी हे पाणी पिणे आवश्यक आहे.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. 

यामुळे शरीरातील तांब्याची कमतरता भरुन निघते. तसेच रोग पसरवणाऱ्या जिवाणूंपासून शरीर सुरक्षित ठेवते.

तांब्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी हे त्या धातूंच्या नैसर्गिक जंतूनाशक गुणधर्मामुळे फक्त निर्जंतुकच होते असे नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी असते.

शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याचे पाणी फायदेशीर आहे. 

याशिवाय हे पाणी यकृत आणि किडनी निरोगी ठेवतो. 

कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणे लाभदायक असते.

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी शुद्ध मानले जाते. हे पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणाऱ्या जिवाणूंना नष्ट करते.

तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीराला वेदना, वात आणि सूज येत नाही. 

संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने फायदा होतो.

पोटाच्या सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी तांब्याचे पाणी अतिशय उपयोगी असते. 

दररोज हे पाणी प्यायल्यास पोटदुखी, गॅस,अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post