धक्कादायक... माजी मुख्यमंत्र्यांना आला हृदयविकाराचा झटका


वेब टीम : रांची
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला.

त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांना (व्हेंटीलेटर) कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवले आहे.

अजित जोगी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक मानले जातात.

काही दिवसांपूर्वी अपघातात अजित जोगी यांचा एक पाय अधू झाला.

तेव्हापासून अजित जोगी हे व्हिल चेअरचा आधार घेत होते. त्यांना आज हृदय विकाराचा तीव्र झटका आला.

आज सकाळी नाश्ता करताना अजित जोगी यांच्या छातीत दुखू लागले.

त्यामुळे त्यांच्या पत्नीने आणि घरातील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.

मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमढील राजकारणावर त्यांचे वर्चस्व आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post