चिन्यांची मुजोरी कायम; सीमेवर तणाव वाढला; सैन्य तैनात


वेब टीम : लडाख
लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी लेह येथील 14 वाहिनीच्या मुख्यालयाला भेट दिली आणि एलएसीवरील वादग्रस्त जागेसह संपूर्ण परिसराच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.

भारतीय सैन्य त्सो लेकजवळ आणि गॅल्व्हान व्हॅलीजवळच्या दोन्ही ठिकाणी चिनी सैन्याशी सामना करण्यासाठी सैन्य पाठवत आहे.

इतर अनेक संवेदनशील भागात भारत चीनपेक्षा चांगल्या परिस्थितीत आहे, असे एका लष्कर अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

लडाखमध्ये या आठवडयाच्या सुरुवातीला दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली होती.

त्यानंतर ही घटना घडली. भारतीय जवानांना ताब्यात घेतल्यानंतर मोठया प्रमाणात तणाव निर्माण झाला होता.

पण दोन्ही बाजूच्या कमांडर्समध्ये बैठक झाल्यानंतर परिस्थिती सामान्य झाली.

भारताबरोबर असलेला सीमावादाचा संघर्ष चीन आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे.

गेल्या दोन आठवड्यांत विशेषत: गॅल्व्हन व्हॅलीमध्ये चिनी सैन्यानं सुमारे 100 तंबू उभारले आहेत.

चिनी सैन्य तिथे बंकर बनवण्याच्याही प्रयत्नात आहे. भारतीय सैन्य विरोध करत असतानाच चीन घुसखोरी करत असल्याचं दिसत आहे.

भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

लडाख येथील नियंत्रण रेषेवर चीनने सैन्य वाढवले आहे.

तर भारतानेही आपल्या सैन्याला तैनात केले आहे.

तर आता आलेल्या माहितीनुसार नियंत्रण रेषेजवळ पहारा देणाऱ्या भारतीय लष्कर आणि इंडो तिबेटीयन बॉडर्र पोलिसांच्या गस्ती पथकाला चीनने ताब्यात घेतले होते.

मात्र आता त्यांना सोडून देण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post