चिन्यांची मुजोरी; भारतीय सैनिकांसोबत केला संघर्ष...


वेब टीम : दिल्ली
सिक्किममधील भारत-चीन सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्याचे जवान आमने-सामने आले.

यावेळी दोन्हीकडील सैनिकांमध्ये हाणामारी झाली.

यात दोन्ही बाजूंचे सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत.

उत्तर सिक्कीम येथे भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हा संघर्ष झाला.

मात्र, नंतर स्थानिक पातळीवरील चर्चेनंतर सैन्य मागे घेण्यात आले.

तसे पाहिले असता सीमेबाबतच्या वादामुळे अशा घटना भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये अधूनमधून घडत असतात.

अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर दोन्ही बाजूचे लष्कर प्रस्थापित प्रोटोकॉलनुसार निर्माण झालेली समस्या सोडवतात.

आजची घटना बर्‍याच दिवसांनी घडलेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post