कोरोनाचा फटका; देशाचा विकासदर जाणार शून्याच्या खाली...


वेब टीम : दिल्ली
कोरोनाच्या संकटाचा परिणाम जगभरातील आर्थिक घडामोडींवर झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात तसेच रिव्हर्स रेपो दरात कपातीचा निर्णय घेतला.रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात केल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी  दिली.

२०२०-२१ या आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर शून्याखाली जाणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

दास आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यांनी रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे रेपो दर ४.४० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आले आहेत. रिव्हर्स रेपो दरात ३.३५ टक्क्यांवर आले आहेत.

कोरोनाचा सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनचा सेवा क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली.

बाजारातील मागणीतही ६० टक्क्यांची घट झाल्याचे ते म्हणाले.

डाळीच्या वाढत्या किंमती हा चिंतेचा विषय असल्याचे ते म्हणाले.महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी कर्जाचे हप्ते न भरण्याची मुभा आणखी तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कर्जदारांना हा दिलासा दिल्याची माहिती ही दास यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post