३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला; केंद्र सरकारचा निर्णय


वेब टीम : दिल्ली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला देशातील लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.

यासोबत सोमवारपासून लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच देशाला संबोधित करताना लॉकडाउन वाढवणार असल्याचे जाहीर केले होते.

मात्र यावेळी त्यांनी त्यासंबंधी सविस्तर माहिती दिली नव्हती.१७ मे रोजी यासंबंधी माहिती दिली जाईल असे त्यांनी सांगितलं होते.

त्यानुसार आज घोषणा करण्यात आली असून देशात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.

केंद्र सरकारने लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवणार असल्याचे  जाहीर केले असले तरी नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

कॅबिनेट सचिव रात्री ९ वाजता सर्व राज्यांच्या मुख्य सचिव तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत.

यावेळी लॉकडाउन ४ च्या नियमावलीसंबंधी चर्चा होणार असून त्यानंतर ती जाहीर केली जाणार आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post