यंदाच्या वर्षात भारताचा विकासदर राहणार शून्य टक्के...


वेब टीम : दिल्ली
चालू आर्थिक वर्षात आर्थिक प्रगतीचा दर शून्यावर राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था ‘मूडीज’ने वर्तविला आहे.

लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेची मोठी पडझड होण्याची शक्यताही मूडीजने वर्तविली.

चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती होणार नाही.

मात्र, २०२१-२२मध्ये अर्थव्यवस्था उभारी घेईल, असा अंदाजही मूडीजने व्यक्त केला आहे.

२०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होऊन देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाढ ६.६ टक्क्यांपर्यंत असेल, असेही मूडीजने आपल्या अहवालात म्हटले आहे.

फिच या संस्थेनेही काही दिवसांपूर्वी असाच इशारा दिला होता. त्यामुळे निश्चित भारताची चिंता वाढवणार, असे म्हटले जात आहे.

मूडीजने ताज्या अहवालात राजकोषीय धोरणाच्या संदर्भातही भाष्य केले आहे.

आर्थिक तूट ५.५ टक्के राहील, असा अंदाज या अहवालात व्यक्त केला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंदाजपत्रक सादर करताना आर्थिक तूट ही ३.५ टक्के असेल असे सांगितले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post