अखेर झुकवलेच... कोरोनाची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्यास चीन तयार


वेब टीम : बीजिंग
कोरोना संसर्गाच्या मुद्द्यावरून जगभरातून जोरदार टीका होत असल्याने आता चीनने आंतरराष्ट्रीय चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेने चीनवर सातत्याने टीका केली.

त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत याचे पडसाद उमटले. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी याबाबतची माहिती दिली.

वांग यी यांनी चीनच्या वार्षिक संसदेच्या बैठकीत सांगितले की, कोरोना संसर्गाचे स्रोत पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैज्ञानिकांच्या समुदायासोबत काम करण्यास चीन तयार आहे.

ही चौकशी निष्पक्ष, व्यावसायिक आणि रचनात्मक पद्धतीने असली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

चौकशी निष्पक्ष असणे म्हणजे तपास प्रक्रिया ही कोणत्याही राजकीय हस्तक्षेपांपासून मुक्त असायला हवी, अशी अट चीनने घातली आहे.

सगळ्याच देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर सन्मान झाला पाहिजे आणि कोणत्याही निष्कर्षावरून कोणालाही दोषी ठरवण्याच्या बाबींना विरोध झाला पाहिजे.

कोरोना संसर्गाच्या मुद्द्यावरून चीनची बदनामी करण्याचा आणि अफवा पसरवण्याचा अमेरिकेचा कट अपयशी झाला असल्याचे वांग यी यांनी म्हटले.

कोरोनाचा संसर्ग हा वुहान येथील प्रयोगशाळेतून बाहेर आला असल्याचा आरोप करत कोरोना व्हायरस हा चिनी व्हायरस असल्याची टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post