फेसबुकनंतर जीओला मिळाला नवीन भागीदार; 'या' कंपनीने केली ५ हजार कोटींची गुंतवणूक...


वेब टीम : दिल्ली
अमेरिकेतील खासगी कंपनी सिल्वर लेक जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये ५ हजार ६५५.७५ कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.

४.९० लाख कोटी रुपये मूल्य असलेले १.१५ टक्के शेअर्स ही कंपनी विकत घेणार आहे.

फेसबुकने जिओमध्ये जवळपास ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर दोनच आठवड्यात सिल्वर लेकही गुंतवणूक करणार असल्याचे रिलायन्सने सांगितले.

या व्यवहारामुळे रिलायन्सला आपले कर्ज करण्यासाठी आणखी हातभार लागणार आहे.

सिल्वर लेक जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये ५ हजार ६५५.७५ कोटी रुपये गुंतवणार असल्याचं रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स जिओ जाहीर करत आहे.

या गुंतवणुकीचे मूल्य ४.९० लाख कोटी रुपये असेल,असे जिओ आणि रिलायन्स इंडस्ट्रीजकडून संयुक्त पत्रकाद्वारे जाहीर केले.

रिलायन्स जिओ ही रिलायन्स जिओच्या मालकीची कंपनी आहे. फेसबुकनेही नुकतीच जिओमध्ये गुंतवणूक केली.

जिओ इन्फोकॉमचे जवळपास ३८.८ कोटी सबस्क्राईबर्स आहेत.कंपनीवर मालकी ही रिलायन्सचीच कायम राहणार आहे.

या कराराला अजून संबंधित प्राधिकरणाकडून परवानगी मिळणे बाकी आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post