भाजपचा धक्कादायक निर्णय; खडसे, मुंडे, बावनकुळे, तावडेंना कात्रजचा घाट...


वेब टीम : मुंबई
विधानसभेची उमेदवारी न मिळालेल्या व उमेदवारी मिळून पराभूत झालेल्या एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे अशा दिग्गजांना डावलून भाजपने लोकसभा व विधानसभेच्या तोंडावर पक्षात आलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीनाथ पडळकर यांना, तसेच नागपूरचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, डॉ. अजित गोपछडे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.

या चौघांनीही शुक्रवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेले पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आयारामांना झुकते माप दिल्याबद्दल तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार आघाडीच्या पाच व भाजपच्या चार जागा निवडून येतील, अशी स्थिती आहे.

चार जागांसाठी भाजपमध्ये २५ इच्छुक होते. विधान परिषद निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे, विधानसभेत उमेदवारी मिळू न शकलेले एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्याबरोबरच हर्षवर्धन पाटील यांनीही जोर लावला होता.

परंतु, या सर्वांना डावलून भाजपने बाहेरून आलेल्या दोघांसह दोन नवीन चेहर्‍यांना संधी दिली आहे.

भाजपचे सरचिटणीस अरूणसिंग यांनी दिल्लीत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

नागपूरचे माजी महापौर व भाजप नागपूर शहर अध्यक्ष प्रवीण दटके, माजी खासदार व माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post