ग्रीन झोनमध्ये दारूची होणार होम डिलिव्हरी...


वेब टीम : रांची
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे गेल्या काही दिवसांपासून देशभरात मद्यविक्री बंद होती.

राज्य सरकारने आखलेल्या रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनला सशर्त सूट देण्यात आली आहे. यामध्ये मद्यविक्रीलाही परवानगी दिली.

छत्तीसगढ सरकाने राज्यातील ग्रीन झोनमध्ये मद्यविक्रीच्या होम डिलिव्हरीसाठी एक वेब पोर्टल सुरू केले आहे.

लॉकडाऊन दरम्यान मद्यविक्रीच्या दुकांनावर मोठी गर्दी होऊ नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

सरकारकडून मंगळवारी याबाबत माहिती दिली. छत्तीसगढ स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नावावरच ठेवले आहे.

ही कंपनी राज्यातील मद्यविक्रीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून मद्यविक्री बंद केली होती. तसेच अन्य दुकानेही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

केंद्र सरकारकडून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर राज्यांमध्ये सोमवारपासून मद्यविक्रीला सुरूवात झाली.

परंतु या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवले नसल्याचे चित्र देशभर दिसत होते.

छत्तीसगढची राजधानी रायपूरमध्येही तसेच अन्य जिल्ह्यांमध्येही हेच चित्र होते. ही गर्दी कमी व्हावी या उद्देशाने सरकारने मद्य घरपोच देण्याचा निर्णय घेतला.

“राज्य सरकारने मद्याच्या ऑनलाइन विक्रीला परवागी दिली आहे. दुकानांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्राहकांना CSMCL च्या वेबसाईट वरून किंवा कंपनीच्या ऍपवरून आपली ऑर्डर देता येईल.

परंतु होम डिलिव्हरी केवळ ग्रीन झोनमध्येच करण्यात येईल. रायपुर आणि कोरबा परिसरात ही सुविधा उपलब्ध नसेल,” असे राज्याच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

ग्राहकांना ऑनलाइन ऑर्डरसाठी आपला मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आणि पत्ता रजिस्टर करावा लागणार आहे.

त्यानंतर ओटीपीद्वारे व्हेरिफिकेशन करण्यात येईल. त्यानंतर एका व्यक्तीला ५ हजार मिलिलीटरपर्यंत ऑर्डर करता येईल. यासाठी १२० रुपये डिलिव्हरी शुल्क मोजावे लागणार असल्याचे सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post