उत्तरप्रदेशात दारूविक्रीचा उच्चांक; एकाच दिवसात 'इतक्या' कोटींच्या दारूची विक्री

file photo

वेब टीम : दिल्ली
टाळेबंदीच्या काळात काल पहिल्यांदाच मद्यविक्रीला परवानगी दिल्यानंतर देशभरातील विविध शहरांमध्ये लोकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

उत्तर प्रदेशात काल एकाच दिवशी सुमारे २६ हजार मद्याच्या दुकांनामधून लोकांनी तब्बल १०० कोटींचे मद्य विकले गेले.

उत्तर प्रदेशात दर दिवशी ७० ते ८० कोटी रुपयांची मद्यविक्री होत असते.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये ४ तासांमध्ये ६.३ कोटी रुपयांची विक्री झाल्याचे महसूल अधिकाऱ्याने सांगितले.

उत्तर प्रदेशात एकूण २६ हजार मद्यविक्रीची दुकाने उघडण्याचे आदेश दिल्याचे उत्तर प्रदेशच्या महसूल विभागाचे प्रधान सचिव संजय भुसरेड्डी यांनी माहिती देताना सांगितले.

उत्तर प्रदेशात कोणत्याही मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर लोकांनी गर्दी करू नये आणि ते सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतात की नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post