झाला खेळ आता... राज्यातील सर्व दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश


वेब टीम : मद्रास
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याने राज्यातील सर्व दारुची दुकाने लॉकडाउन संपेपर्यंत बंद करण्याचे आदेश तामिळनाडू सरकारला मद्रास उच्च न्यायालयाने दिले आहे.

लॉकडाउन दरम्यान गुरूवारी(दि.७) पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये दारुची दुकाने सुरू झाली होती.

पहिल्याच दिवशी जवळपास १७० कोटी रुपयांच्या दारुची विक्री तामिळनाडूमध्ये झाली.

पण, शुक्रवारी (दि.८) पुन्हा एकदा तामिळनाडूमधील सर्व ३८५० दारु दुकाने बंद करण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.

यापूर्वी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानेही मद्याच्या दुकानांवर गर्दी उसळत असल्याने टाळेबंदीच्या काळात थेट संपर्काशिवाय किंवा ऑनलाईन विक्री आणि घरपोच सेवा या पर्यायांचा विचार करावा, अशी सूचना राज्य सरकारांना केली आहे.

आम्ही कोणताही आदेश देणार नाही. पण, सर्व राज्यांनी सोशल डिस्टसिंगच्या नियम आणि निर्देशांचे पालन व्हावे, यासाठी अप्रत्यक्ष विक्री अर्थात होम डिलिव्हरीचा विचार करावा, अशी सूचना न्यायालयाने राज्यांना केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post