लॉकडाऊन ४ : काय होणार सुरु, काय राहणार बंद...?


वेब टीम : दिल्ली
देशभरात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

३१ मेपर्यंत हे लॉकडाऊन वाढवण्यात आहे.

लॉकडाऊनचा चौथा टप्पा १८ ते ३१ मे पर्यंत असा १४ दिवसांचा असणार आहे.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही देशभरातील सर्व मॉल, शाळा, कॉलेज, जिम इत्यादी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय देशभरातील मेट्रो आणि विमानसेवाही ३१ मे पर्यंत बंद राहणार आहे.

काय सुरु राहणार?
ऑनलाईन लर्निंग सुरु राहणार
स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम सुरु होणार, मात्र प्रेक्षकांना जमा होण्यासा परवानगी नाही
स्टेडियम प्रॅक्टिससाठी सुरु होणार
सरकारी कार्यालये सुरु होणार
सरकारी कॅन्टिन सुरु राहणार
बस किंवा इतर वाहनांमधून प्रवाशांच्या आतंरराज्य प्रवासाला परवानगी. यावेळी दोन्ही राज्यांनी एकमेकांची संमती घेणं आवश्यक असणार आहे. कंटेनमेंट झोनला यामधून वगळण्यात आलेलं आहे.

काय बंद राहणार?
आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा
मेट्रो सेवा बंद राहणार
शाळा-कॉलेज बंद राहणार
हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार
थिएटर, शॉपिंग मॉल, जिम, पूल, पार्क, बार बंद राहणार
सर्व धार्मिक प्रार्थनास्थळं, धार्मिक व सामाजिक कार्यंक्रमांना परवानगी नाही

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post