खुशखबर : २४ तासांत मॉन्सून होणार भारतात दाखल...


वेब टीम : पुणे
बंगालच्या उपसागरासह अंदमान आणि निकोबार बेटांवर येत्या २४ तासांत नैऋर्त्य मोसमी पाऊस (मॉन्सून) दाखल होणार आहे.

मात्र, पश्चिम बंगाल, बांग्लादेश ते अगदी ओडिसाच्या किनारपट्टीपर्यंत १८ ते २१ मे दरम्यान अति तीव्र चक्रीवादळ येणार आहे.

त्यामुळे केरळसह कर्नाटक ते अगदी कोकण आणि आसपासच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस बरसणार आहे.

बंगालच्या उपसागरातील दक्षिण-पूर्व भागावर तयार झालेले कमी (खोल) दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर अति खोल कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे.

पुढील २४ तासांत या अति खोल कमे दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये, त्यानंतर १८ ते २१ मे दरम्यान हे चक्रीवादळ अति तीव्र चक्रीवादळामध्ये रूपांतरीत होणार असून, ओडिसाच्या दक्षिण भागातील पारादीप किनारपट्टीपासून ते पश्चिम बंगालच्या खेपपुपारा तसेच बांग्लादेशापर्यंत पोहचणार आहे.

या अति तीव्र चक्रीवादळामुळे किनारपट्टीसह समुद्रात ताशी ५५ ते ६५ कि.मी.वेगाने वारे वाहणार आहेत.

यामुळे केरळ, कर्नाटक तसेच कोकण व आसपासच्या भागात मुसळधार पाऊस बरसणार आहे.

दरम्यान, या स्थितीमुळे मॉन्सून बंगालच्या उपसागरासह अंदमान आणि निकोबार बेटांवर येत्या २४ तासांत दाखल होणार असला तरी चक्रीवादळामुळे वातावरणातील बाष्प खेचून घेणार असल्याने केरळकडे मॉन्सूनचा प्रवास धीम्या गतीने होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post