परिवहन मंत्र्यांनी केली घोषणा... राज्यातील 'या' लोकांसाठीही सुरु होणार एसटीची बससेवा


वेब टीम : मुंबई
आंतरजिल्ह्याबाबत नीट नियोजन करुन, मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने अडकलेल्या लोकांची गावाला जाण्याची व्यवस्था केली जाईल अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

आंतरजिल्हा एसटी सेवेचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेतला जाईल असे ही त्यांनी सांगितले.

परब यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

जे परराज्यातील लोक आहेत त्यांना आपल्या राज्याच्या सीमेवर आणि परराज्यातून आपल्या सीमेवर आलेल्यांना तसेच आंतरजिल्ह्यात अडकलेल्यांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी मोफत एसटी सेवा देऊ असे आम्ही जाहीर केले होते.

माहिती घेण्यास सुरुवात केली असता रेड झोनमधून बाकीच्या जिल्ह्यात माणसे पाठवू नका, तिथे कोरोना पसरवू नका अशा स्वरूपाच्या तक्रारी आमच्याकडे आल्या.

त्यामुळेच आम्ही आंतरजिल्ह्याचा निर्णय थांबवला, असे अनिल परब यांनी यावेळी सांगितले.

मुंबईतून अन्य जिल्ह्यांमध्ये माणसे पाठवू नका अशा तक्रारी आमच्याकडे आल्या.

जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही परवानगी मागितल्या होत्या.

मुंबईतून कोरोना आपल्या गावी येईल अशा अफवा गावी पसरल्या आहेत.

त्यामुळे गावकऱ्यांनी विरोध केला, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

जे लोक परराज्याच्या सीमेवर जाण्यास इच्छूक आहेत त्यांना अद्यापही मोफत सेवा सुरु आहे.

एका दिवसात २५० ते २७५ बसेसने पाच हजार प्रवासी परराज्याच्या सीमेवर सोडले आणि तीन हजार प्रवासी परराज्यांच्या सीमेवरुन आपापल्या जिल्ह्यात सोडले, अशी माहिती परब यांनी दिली.

लोक अडकलेत याची आम्हाला देखील जाणीव आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नियोजनबद्ध निर्णय घेत आहोत.

जे लोक रस्त्यावरुन चालत आहेत, त्यांना आधी मोकळं करुन, जिल्ह्यांबाबतचा निर्णय घेऊ, असे अनिल परब म्हणाले.

यावेळी त्यांनी आवाहन करताना ते म्हणाले, एसटी डेपोमध्ये गर्दी करु नका, आपली काळजी आम्हाला आहे.

लवकरात लवकर निर्णय घेऊ, कृपया स्टॅंडवर जाऊ नका.

तिथे प्रक्रिया होणार नसून पोलीस स्टेशन किंवा तहसीलला प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post