'या' अभिनेत्याच्या जीवनात वादळ; पत्नीने केला घटस्फोटासाठी अर्ज


वेब टीम : मुंबई
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या जीवनात वादळ निर्माण झाले आहे.

पत्नी आलिया हिने त्याला घटस्फोटासाठी नोटीस पाठविली आहे.

तिने पोटगीचीही मागणी केली आहे.

आलिया हिने आपल्या वकिलामार्फत ही घटस्फोटाची नोटीस ई-मेलद्वारे आणि व्हाट्सअद्वारे तसेच स्पीड पोस्टद्वारे नवाजुद्दीन सिद्दिकीला पाठवली आहे.

दहा वर्षांच्या वैवाहिक जीवनात आता अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून आता हे संबंध पुढे टिकविणे अशक्य असल्याचे आलिया हिने आपल्या घटस्फोटाच्या नोटिशीत म्हटले आहे.

तसेच तिने घटस्फोटाची आणि पोटगीची मागणी केली आहे.

आलिया हिच्या वकिलाने घटस्फोटाची बातमी जगजाहीर केली आहे.

आलियाच्या वकीलांनी सांगितले की, या घटस्फोटाच्या नोटीसमधील काही गोष्टी गंभीर स्वरूपाच्या आणि संवेदनशील असून त्या उघड करता येणार नाही.

आम्ही नवाजुद्दीन सिद्दिकीला घटस्फोटाची नोटीस पाठविली असली तरी नवाजुद्दीनकडून त्याला कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांच्या लग्नाला दहा वर्ष झाली असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून या विवाहात गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या.

आलिया आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या संबंधांमध्ये नवाजुद्दीन आणि त्याच्या भावामुळे समस्या निर्माण झाल्याचे आलियाच्या वकिलांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post