पाकिस्तानला दणका; भारतात हेरगिरी करणारे कबुतर पकडले


वेब टीम : श्रीनगर
भारताविरोधात हेरगिरी करण्यासाठी खोडसाळपणे पाकिस्तानने पाठविलेले संशयित कबुतर जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यालगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सोमवारी पकडण्यात आले आहे.

या कबुतराने कुटनितिक भाषेतील संदेश भारतात आणला होता.

याद्वारे काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांना सूचक इशारा देण्यात आला आहे.

सध्या गुप्तचर संस्थांद्वारे या संदेशाचा अर्थ समजून घेतला जात आहे.

भारत-पाक सीमेवरील हिरानगर सेक्टरच्या मनयारी गावातील लोकांनी मोठ्या शिताफीने पाकने पाठविलेल्या कबुतराला पकडले आहे.

त्यानंतर त्यास स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

या कबुतराची नीट पाहणी केली असता त्याच्या उजव्या पायात एक अंगठी आढळून आली आहे.

तिच्यावर काही क्रमांक नमूद होते.

सध्या गुप्तचर अधिकारी व पोलीस विभाग या अंगठीवरील गुप्त संदेशाचे अध्ययन करीत आहेत.

दरम्यान, भारत-पाकिस्तान सध्या कोरोना महामारीचा सामना करीत आहेत.

तरीही पाकने सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघन सुरूच ठेवले आहे.

याशिवाय पंजाबमध्ये संशयित ड्रोन पाठवून पाकिस्तान नेहमीच भारताला डिवचण्याचा प्रयत्न करीत असतो.

आता ताज्या घटनाक्रमात कबुतराच्या माध्यमातून संदेश पाठविण्याचा खोडसाळपणा पाकने केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post