पंकजा मुंडेंची डाळ शिजेना; धनंजय मुंडे गेले रावसाहेब दानवेंच्या भेटीला


वेब टीम : औरंगाबाद
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी शुक्रवार सायंकाळी भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भोकरदन (जि. जालना) येथे जाऊन भेट घेतली.

दानवे यांच्यावतीनं धनंजय मुंडे यांचा कौटुंबिक सत्कारही करण्यात आला.

यावेळी मंत्री मुंडे यांनी जिल्ह्यात कोरोना टाळेबंदीमुळे कापूस खरेदी केंद्रांना मर्यादा लावल्या असून, नोंदणी केलेल्या एका शेतकऱ्याचा ४० क्विंटलच कापूस खरेदी केला जात आहे.

त्यामुळे शेतकरी अडचणीत येत असल्याने खरेदी केंद्राची संख्या वाढण्याची मागणी यावेळी मुंडे यांनी दानवे यांच्याकडे केली.

कोरोनाचे संकट असूनही राज्यातील राजकीय स्थिती अस्थिर होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणुकीला मंजुरी दिली आहे.

त्यामुळे आता विधानपरिषदेवर जाण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपात इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे.

त्यातच भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे याना विधानपरिषदेवर पाठवण्यात यावे अशी मागणी त्यांच्या समर्थकांमधून होत आहे.

याच पार्शभूमीवर त्यांचे बंधू असूनही राजकीय प्रतिस्पर्धी असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी (१ मे) केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भोकरदन येथे निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

या दोन उभय नेत्यांमध्ये मोठी चर्चा झाली असून, राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post