पुणे : शहरातील दारूची दुकाने सुरु राहणार की नाही? प्रशासन म्हणते...


वेब टीम : पुणे
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार आज पासून (४ मे) शहरातील दारू दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले.

परंतु, शासनाकडून अद्याप कुठलाच लेखी आदेश प्राप्त झाला नसून जेव्हा आदेश प्राप्त होईल

त्यानंतर शहरातील मद्यविक्री दुकाने सुरू करायची किंवा नाही याबाबत विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्य सरकारचे सचिव भूषण गगराणी यांनी रविवारी मद्या विक्री केंद्र सुरू करण्याचे आदेश देत शहरांतील हॉटेल, रेस्टॉरंट मात्र बंद ठेवण्याचे स्पष्ट केले.

तसेच दारूच्या दुकानांवर गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस.टी.झगडे यांनी स्पष्ट केले.


मद्यविक्री बंदीमुळे राज्याच्या महसूलात चांगलीच घट झाली असताना दुसरीकडे तळीरामांची अडचण झाली होती.

बहुतांश ठिकाणी तर मद्य विक्रीचे दुकान तोडल्याचे प्रकार देखील घडले.

तर काही ठिकाणी अधिक पैसे मोजून काही दिवसा दारू विक्री सुरू असल्याचेही चित्र होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post