वेब टीम : मुंबई मजुरांच्या स्थलांतरणावरून योगी आदित्यनाथ यांनी सरकारची परवानगी असल्याशिवाय मजुरांना स्थलांतर करता येणार नाही, असा निर्ण...
वेब टीम : मुंबई
मजुरांच्या स्थलांतरणावरून योगी आदित्यनाथ यांनी सरकारची परवानगी असल्याशिवाय मजुरांना स्थलांतर करता येणार नाही, असा निर्णय घेतला.
त्यांच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.
यूपीच्या कामगारांनाही महाराष्ट्रात येण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, असे राज ठाकरे यांनी सुनावले आहे.
फेसबूक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करारा जवाब दिला आहे.
उत्तरप्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तरप्रदेश सरकारची परवानगी लागेल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
मग जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हेही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं.
तसंच महाराष्ट्र राज्य सरकारनेही ह्या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं.
ह्यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्रानं पाळावा- अशी पोस्ट राज ठाकरे यांनी लिहिली आहे.