खुशखबर : स्टेट बँकेने केली मोठी घोषणा, कर्जावर आता 'इतका' व्याजदर


वेब टीम : मुंबई
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आधी बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओव्हरसीज बँकने व्याज दरात कपात केली होती.

या दोन्ही बँकांनी १० बेसिस पॉइन्टस इतकी कपात केली होती.

इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एक वर्षाच्या व्याज दरात ०.१० टक्के कपात करत तो ८.१५ टक्के इतका केला.

तर बँक ऑफ महाराष्ट्रने व्याज दरात ०.१० टक्के कपात करत तो ७.९० टक्के केला.

देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली.

बँकेने एमसीएलआर आधारित लोनवरील व्याज दरात १५ बेसिस पॉइन्टसची कपात केली असून व्याजदरातील ही कपात सर्व कालावधीच्या कर्जावर केली आहे.

या व्याजदर कपातीनंतर एक वर्ष कालावधीच्या कर्जावर व्याजदर ७.४० टक्क्यांवरून ७.२५ टक्के इतका झाला आहे.

नवे व्याजदर १० मे पासून लागू होतील.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार सलग १२व्यांदा व्याज दरात कपात केली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने टर्म डिपॉझिटवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

या व्याजदरातील कपात २० बेसिस पॉइन्टस इतकी केली असून ती १२ मे पासून लागू होणार आहे.

याशिवाय बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय व्हीकेअर डिपॉझिट योजना सुरू केली आहे.

या योजनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना ५ वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अधिक कालावाधीसाठी ठेवींवर अधिक व्याज मिळेल.

ही योजना ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लागू असेल असे बँकेने म्हटले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post