सर्व शाळा, कॉलेज यावर्षी बंद ठेवण्याची घोषणा...


वेब टीम : न्यूयॉर्क
अमेरिकेत कोरोनाची साथ अजूनही वेगाने पसरते आहे.

न्यूयॉर्क हे शहरच कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ बनले आहे.

त्यामुळे खबरदारी म्हणून न्यूयॉर्कमधील सर्व शाळा, कॉलेज या वर्षी बंद ठेवण्याची घोषणा न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू क्‍युमो यांनी केली आहे.

अँड्र्यू क्‍युमो त्यांनी अधिकाऱ्यांना राज्यातील प्रत्येक शाळेतील स्वच्छता, सोशल डिस्टंसिंग नियम कसे पाळायचे याबाबत सूचना दिल्या.

काही दिवसांमध्ये या सर्व महत्त्वाच्या विषयांवर योजना तयार केल्या जातील व त्यांचा अवलंब केला जाईल, असे सांगितले.

मुलांना सुरक्षित ठेवण्याच्या आणि समस्येचे निराकरण करण्याच्या अधिक योजनांवर विचार सुरू आहे, असे क्‍युमो म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post