वेब टीम : वॉशिंग्टन अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने खासगी कंपनी स्पेसएक्सच्या अंतराळ यानातून २ अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्था...
वेब टीम : वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने खासगी कंपनी स्पेसएक्सच्या अंतराळ यानातून २ अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) पाठविले.
भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास रॉकेट केनेडीने स्पेस सेंटर येथून उड्डाण केले.
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प मिशन लॉन्च पाहण्यासाठी फ्लोरिडास्थित अंतराळ केंद्रात गेले होते.
प्रक्षेपणानंतर काही तासांनी त्यांनी सांगितले की स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल यशस्वीरित्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पोहोचला आहे.
दोन्ही अंतराळवीर सुरक्षित आणि स्वस्थ आहेत.
या मिशनला ‘क्रू-डेमो-२’ आणि रॉकेटला ‘क्री-ड्रॅगन’ नाव देण्यात आले आहे.
याद्वारे नासाचे अंतराळवीर रॉबर्ट बेनकेन आणि डगलस हर्ले १९ तासांत आयएसएस पोहचतील.
२१ जुलै २०११ नंतर पहिल्यांदा अमेरिकेच्या धरतीवरून एखादे मानव मिशन अंतराळात पाठवण्यात आले.
स्पेसक्राफ्टची लॉन्चिंग अमेरिकेच्या विश्वासू रॉकेट फॉल्कन-९ ने करण्यात आली.
स्पेसएक्स अमेरिकन उद्योगपती अॅलन मस्क यांची कंपनी आहे. ही कंपनी नासाबरोबर भविष्यात अनेक अंतराळ मोहिमेवर काम करीत आहे.
COMMENTS