पाकिस्तानचा उडणार थरकाप; सर्जिकल स्ट्राईकसाठी हवाईदल सज्ज


वेब टीम : दिल्ली
दहशतवादाला सातत्याने खतपाणी घालत असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी बालाकोटसारखी कारवाई करण्यासाठी हवाईदल सदैव तयार असल्याचे प्रतिपादन हवाईदल प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी सोमवारी केले.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोटचा दहशतवाद्यांचा तळ नष्ट केला होता.

जेव्हा जेव्हा आपल्या मातीत दहशतवादी घटना घडतात, तेव्हा पाकिस्तान अस्वस्थ होतो.

त्यांची चिंता बरोबर आहे.

त्यांना जर या चिंतेतून बाहेर पडायचे असेल, तर त्यांना भारतातील दहशतवाद थांबवावाच लागेल, असेही भदौरिया म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post